Type Here to Get Search Results !

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश चारोळी शायरी 2024 | Shivjayanti quotes wishes shayri charolya Marathi

शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा संदेश चारोळी शायरी 2024 | Shivjayanti quotes wishes shayri charolya Marathi

फेब्रुवारी महिना आला की आपल्या सर्वांना वेध लागते ते आपल्या राज्याच जयंतीचे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे दरवर्षी पण 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेप्रमाणे साजरी करत असतो या वर्षीसुद्धा 19 फेब्रुवारी 2024 रोजी आपण शिवाजी महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी करणार आहोत याच शिवजयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठीत ( shiv jayanti quotes wishes in marathi ) देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही चारोळ्या कविता स्टेटस शायरी घेऊन आलो आहोत नक्कीच आपणास शिवजयंती स्टेटस व्हाट्स अप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर किंवा शेअर चॅट वर स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता .


शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

प्राणपणाने लढून राजे, तुम्ही जिंकले किल्ले. दुश्मनाचे सदा परतुनी, तुम्ही लावले हल्ले. धर्म रक्षणासाठी घेतला जन्म जिजाऊंच्या पोटी, हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी.

Shivjayanti quotes Marathi 2024

हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मावळ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवबा राजे तुम्ही अजून काही वर्षे जगला असता तर मुघलांनी देखील हातामध्ये भागवाच धरला असता.

Shivjayanti wishes Marathi

घासल्याशिवाय धार नाही. तलवारीच्या पातीला.शिवबांशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्राच्या मातीला.

Shivjayanti shayri Marathi

त्या राष्ट्रद्रोह्यांनी अन्यायाचा कळस गाठला नसता, तर हा मर्द मराठी माणूस पेटून उठला नसता. शिवबांची तलवार रणात चमकली नसती, तर या भारतात महाराष्ट्र कदापि दिसला नसता.

Shivjayanti charolya Marathi 2024

तलवारी तर सर्वाच्याच हातात होत्या, ताकत तर सर्वाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची जिद्द फक्त आणि फक्त शिवरायांमध्येच होती.

Shivjayanti whatsapp status Marathi

भगवे आमचे झेंडे आणि भगवे आमचे रक्त. फक्त आणि फक्त. आम्ही शिवरायांचे भक्त.

Shivjayanti whatsapp sms Marathi

स्वराज्याच्या काळात,सुखात प्रजाजन नांदले. कारण प्रजाहित दक्ष होते, आपुले शिवबा राजे.

Shivjayanti banner Marathi

नाही लाभणार राजे,शिवबांसारखे आम्हाला, म्हणून कळकळीने सांगतात सर्व, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला.

Shivjayanti shubhechha Marathi

गगनभेदी नजर ज्यांची,पहाडासम विशाल काया. धगधगता सूर्य झुकतो, वंदितो प्रभू शिवराया.प्रजेला ज्यांनी समजले माय बा मात्र शत्रूंचा झाला थरकाप. स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे, आम्हाला अभिमान.


आले किती गेले किती,उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा.


सह्याद्रीच्या दरी खोट्यातून, नाद भवानी गाजे. काळजात राहती आमुच्या, छत्रपती शिवाजी राजे.


यवनांच्या आक्रमणाची, याद आहे अजूनही ताजी. गनिमांच्या उरावर नाचले होते, शूरवीर छत्रपती शिवाजी.


हिंदू धर्म राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले. गर्जुनिया केला स्वराज्य सोहळा साजरा,छत्रपती शिवाजी राजे तुम्हा मानाचा मुजरा.


विजेसारखी तलवार चालवून गेलात, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेलात, वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडून गेलात, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो गनिमांना नडून गेलात. शिवबा राजे तुम्ही रयतेच्या हृदयावर राज्य करून गेलात.


छाती होती पोलाद ज्यांची, डोळ्यात त्यांच्या अंगार. मोगलांचा उडाला थरकाप, पाहुनी शिवबांची तलवार.


कापल्या जरी आमुच्या नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमुची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची.


जिथे शिवभक्त उभे राहतात,तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती. मरणाला कुणाची भीती, आदर्श आमचे शिव छत्रपती.


स्त्रियांचा राखला मान, केला मातांचा सन्मान, घेतला जिजाऊंच्या पोटी जन्म छत्रपती शिवरायांचा आम्हा अभिमान.


सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूंचे मर्दन, हीच आम्हा मावळ्यांना छत्रपती शिवरायांची शिकवण.


ना भूमीच्या तुकड्यासाठी, ना सोन्याच्या सिंहासनासाठी, छत्रपती शिवराय लढले, फक्त रयतेच्या सुखासाठी.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad