Type Here to Get Search Results !

26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन भाषण निबंध | 26 january prajasattak din marathi bhashan

'26 जानेवारी' - प्रजासत्ताक दिन 'भाषण' निबंध | 26 january prajasattak din marathi bhashan 2022


26 जानेवारी म्हंटली विद्यार्थ्यांचे लहान मुलांसाठी भाषण किंवा निबंध याची नक्कीच आठवण येत असते , विद्यार्थ्यांकडून 26 जानेवारी चे भाषण निबंध लिहून घेणे छोटे-छोटे भाषणाचीशिक्षकांची पातर करून घेणे  शिक्षकांची खरी कसरत असते तीच कसरत थोडी कमी करण्यासाठी आज आम्ही आपल्यासाठी व विद्यार्थ्यांसाठी 26 जानेवारी चे भाषण मराठीमध्ये घेऊन आलो ते भाषण छोटे छोटे व दहा ओळी चे आहेत त्यामुळे याचा वैद्य तर त्यांना नक्की 26 जानेवारीच्या भाषणांमध्ये फायदा होईल सर्वांना 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा

26 जानेवारी साठी प्रजासत्ताक दिन छोटे छोटे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी भाषण निबंध | Speech on Republic Day in Marathi) 2022


26 january prajasattak din marathi bhashan 2022

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण निबंध मराठी




प्रजासत्ताक दिन भाषण सुरवात 

प्रजासत्ताक दिन (Republic Day Speach) एक असा राष्ट्रीय दिवस आणि राष्ट्रीय उत्सव आहे ज्या दिवसाची वाट लहान मूल- मुली आणि विद्यार्थी मोठ्या आतुरतेने पाहत असतात. शाळे मध्ये प्रजासत्ताक दिन या विशेष दिवशी, भारताचा राष्ट्र ध्वज फडकवला जातो आणि सामूहिक राष्ट्र गीत गायन करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमला अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक शाळा वेग वेगळ्या सामाजिक स्पर्धांचे आयोजन करतात. या मध्ये विविध स्पर्धा असतात. 


🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये


आज च्या या लेखात आपण "26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण आणि निबंध ( Speech on Republic Day in Marathi )" या विषयावर माहिती बघणार आहोत. -

येथे आम्ही 72 व्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी भाषण लिखित स्वरूपात देत आहोत. हे भाषण वापरून विद्यार्थी प्रजा सत्ताक दिनाच्या उत्सवात सक्रिय पणे सहभाग घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठीची सर्व भाषणे अतिशय सोप्या भाषेत लिहिली आहेत. जेणे करून ते प्रजासत्ताक दिनी आपले सर्वोत्तम भाषण सादर करू शकतील -


 भाषण - 1 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण (Speech on Republic Day in Marathi):-

प्रजासत्ताक दिना च्या शुभ मुहूर्ता वर मंचावर उपस्थित असलेल्या सर्व गण मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र व मैत्रिणी आणि पालक या सर्वांना सुप्रभात. मी येथे प्रजासत्ताक दिनाचे भाषण सादर करण्यासाठी आलो/ आली  आहे. जसे की आपण सर्वांना माहित आहे कि, आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही देश “भारत” च्या एका खास प्रसंगी येथे जमलो आहोत. 

आजचा दिवस आपन भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करतो आहे. आमच्या माननीय मुख्या ध्यापक सर / मॅडम, उपप्राचार्य आणि आदरणीय शिक्षकांचा विशेष उल्लेख करून येथे उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. 

प्रजासत्ताक दिनी मी माझ्या भाषणा तून मी माझे विचार मांडणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अशा शुभ मुहूर्ता वर मला माझ्या मुख्याध्यापक सर/ मॅडम, यांना खूप खूप धन्यवाद म्हणायचे आहे, कारण त्यांच्या मुळेच मला या पवित्र मंचा वर येण्याची आणि माझ्या प्रिय देशा बद्दल असणारे माझे विचार/ मत  मांडण्याची इतकी सुंदर संधी त्यांनी मला दिली. 

आज आपण सर्वजण आपल्या देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा आणि शुभ प्रसंग आहे. आपण एकमेकांचे अभिनंदन केले पाहिजे आणि आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी देवा कडे प्रार्थना केली पाहिजे.

आपण दर वर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. 1950 पासून सातत्याने भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतात “पूर्ण स्वराज्य” साठी अहोरात्र संघर्ष केले. आपल्या भावी पिढीला संघर्ष करावे लागू नये आणि परकीयांच्या हाती गुलाम झालेल्या भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

अनंत त्याग, असंख्य बलिदान चे परिणाम म्हणून आज आपण खुल्या हवेत आपल्या अधिकारांचा श्वास घेऊ शकत आहे.  भारत हा एक लोकशाही देश (Democtartic Country) आहे, जिथे लोकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार आहे. 

डॉ राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 1947 मध्ये ब्रिटीश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाल्या पासून वर्तमान "नव्या भारत" (New India) ने खूप विकास केलाआहे आणि म्हणूनच भारताची गणना आज सर्वात शक्तिशाली आणि जलद गतीने विकास गाठणाऱ्या देशां मध्ये केली जाते.

पण या विकासा बरोबर काही उणिवा ही निर्माण झाल्या आहेत. जसे की विषमता, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता, स्त्री भ्रूण हत्या, इत्यादी. आपला देश जगातील सर्वोत्तम देश बनवण्यासाठी समाजातील अशा समस्या सोडवण्याची आज आपण प्रतिज्ञा घेण्याची गरज आहे.

मला अशा आहे ज्या प्रकारे आपल्या पूर्वजांनी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावले त्याच प्रकारे आपण सर्वे मिळून या उणिवांना भारतातून समूळ उच्चाटन करू या. 

एवढे बोलुनी मी माझे भाषण या शब्दांनी संपवणार आहे, जय हिंद जय भारत, धन्यवाद.


🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2022

26 जानेवारी भाषण प्रजासत्ताक दिनाचे भाषण निष्कर्ष -

आशा आहे की आमचे 26 जानेवारी चे मराठी भाषण तुम्हांला नक्कीच आवडेल असेल ,त्याचा तुम्हांला नक्कीच भाषण निबंध व सूत्रसंचालन यामध्ये नक्कीच उपयोग होईल. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा .


FAQ

प्रश्न 1: भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात?

 उत्तर : डॉ भीमराव आंबेडकर

 प्रश्न 2: भारताने पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला?

 उत्तर: 1950 मध्ये

 प्रश्न 3: भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 उत्तरः जनरल बिपिन रावत


✡️ हे पण वाचा >
🆕 सावित्रीबाई फुले निबंध व शुभेच्छा
🆕 मकर संक्रांती निबंध मराठी
🆕 लाला लजपतराय निबंध व भाषण
🆕 स्वामी विवेकानंद जयंती निमित्त निबंध व भाषण
🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण व निबंध शुभेच्छा
🆕 नवीन वर्षाच्या शुभेच्छा व इतिहास



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad