Type Here to Get Search Results !

जिजाऊ जयंती निबंध भाषण | Rajmata Jijau Jayanti Essay Speech in Marathi

जिजाऊ जयंती निबंध भाषण - Rajmata Jijau Jayanti Essay Speech in Marathi 2022


नमस्कार मित्रांनो आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन व कविता थोडक्यात माहिती वाचणार आहोत त्याचा उपयोग करून आपण छान असा निबंध भाषण व सूत्रसंचालन करू शकता. तुम्हां सर्वांना राजमाता जिजाऊ याच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.


महाराष्ट्रात जेवढ इतिहास संशोधन, अभ्यास, लिखाण, इ. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वर झालेले तेव्हढ कदाचित कोणत्या हि महापुरुष यांवर झाले असावेत. हे होण्या मागे प्रमुख कारण आहे, महाराष्ट्रा मध्ये या दोन महान व्यक्तीमत्वांना  घरा- घरात आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. याच पार्श्वभूमी वर आज च्या या लेखात आपण "राजमाता जिजाऊ जयंती निबंध भाषण (Rajmata Jijau Jayanti Essay Speech in Marathi)" बघणार आहोत. तर आपण थेट आपल्या आजच्या मुख्य विषया कडे वळू यात -


[ भाषण ] राजमाता जिजाऊ जयंती निबंध भाषण - (Rajmata Jijau Jayanti Essay Speech in Marathi)-

राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी
राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी


राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण प्रास्तविक

सर्व प्रथम सन्माननीय राजमाता जिजाऊ आऊ साहेब आणि वन्दनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा करतो / करते. 

राजमाता जिजाऊ जयंती (Rajmata Jijau Jayanti) च्या पवित्र मुहूर्ता वर या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्या समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र व मैत्रिणी आणि पालक या सर्वांना माझा नमस्कार.

जसे की आपण सर्वांना माहित आहे कि, आज येथे आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयोजित भाषण स्पर्धे साठी जमलो आहे. आणि मला चांगलेच ठाऊक आहे कि, या भाषण स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्या मुळे मी आपला जास्त वेळ न घेता थोडक्यात माझे विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते आपण सर्वांनी शांत पणे ऐकावे अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती!

जिजामाता, (राजमाता जिजाऊ - Rajmata Jijau) यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी भुईकोट राजवाड्या मधे, बुलढाणा (महाराष्ट्र) जिल्ह्यातील सिंदखेडरा  किंवा सिंदखेड प्रांत  या स्थळी झाला होता, हे आपणा सर्वांना माहिती आहे. 


🆕 शिवाजी महाराज यांची मराठी माहिती भाषण निबंध

🆕 वार्षिक नियोजन 2022-23 नवीन अभ्यासक्रमा नुसार

🆕 महाशिवरात्री पूजा कशी करावी मराठी माहिती

🆕 गुरुपौर्णिमा मराठी भाषण निबंध

राजमाता जिजाऊ या हिंदवी स्वराज्य राज्य चे संस्थापक माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या. आज सिंदखेडरा हे ठिकाण केवळ ऐतिहासिकच नव्हे तर, प्रसिद्ध पर्यटन स्थळ सुद्धा बनले आहे. दर वर्षी सिंदखेडरा या स्थळी "राजमाता जिजाऊ यांची जयंती (Rajmata Jijau Jayanti in Marathi)" मोठ्या उत्साहात साजरी केली जातो. हि गर्वाचीच बाब म्हणा. 

राज माता जिजाऊ यांना प्रेमाने ‘जिऊ ’ म्हटले जायचे. लखोजी राजे जाधव म्हणजे राजमाता जिजाऊ यांचे वडील हे परंपरेने देवगिरीचे असलेले यादव (जाधव) होते. या मुळे, जिजाबाई ही देवगिरीची राज कन्या होत्या. पण त्या काळाच्या तत्कालीन परिस्थिती मध्ये लखोजी राजे यांनी आपल्या तीन मुलांसह सुलतानाच्या सैन्यात सरदार होण्याचे मान्य केले. ही गोष्ट जिजाबाईंना फार खटकली होती. 


🆕 गुरु गोविंद सिंग मराठी माहिती निबंध

🆕 महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण

🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता घोषणा मराठी


राजमाता जिजाऊ यांना वाटायचे कि, जे लोक आपल्या माणसांना छाडतात, आपल्या हिंदू दैवतांची विटंबना करतात, गोर- गरीबांची- कष्टाळू शेतकऱ्यांची आर्थिक आणि शारिरीक शोषण करतात, महिलां वर नको ते शारिरीक- मानिसक अत्याचार करतात अश्या लोकां सोबत आपण का म्हणून काम कराचे ?  

चिमुकल्या वयात राजमाता जिजाऊ यांना पडलेला हा प्रश्न त्यांच्या मध्ये असलेली क्रांती ज्योत दाखवून देणारी आहे. 

कदाचित इथून च राजमाता जिजाऊ यांच्या मनात असा विचार आला असावा कि, या गुलाम गिरीतून मुक्त करण्यासाठी असा एक राज्य असावं जेथे महिलांना सन्मान, कष्टाळू शेतकरी यांना मान आणि शोषण मुक्त समाज असावा. 

पुढे राजमाता जिजाऊ यांचे शहाजी राजे भोसले यांच्या सोबत त्या विवाह बंधन मध्ये अडकल्या. येथून त्यांच्या जीवना मध्ये एक टर्निंग पॉईंट आला. 

पुढे एका घटने मुळे लेखोजी राजे जाधव आणि भोसले कुळ यांच्या मध्ये वैचारिक मतभेद आणि आपसी रणजिश मुळे दोन्ही कुळा मध्ये तळा पडली. राजमाता जिजाऊ यांच्या साठी हि तळा जेवढी राजकीय होती त्या हून हि अधिक भावनिक होती. कारण या घटने मुळे त्यांचं माहेर घर त्यांच्या पासून दूर झाले होते. 

नंतर काही वर्षांनी काही कार्नवास्तव शहाजीराजे भोसले यांना पकडण्यासाठी निजामाने लखोजी राजे जाधव यांना आपल्या सैन्या सह जुन्नर ला पाठवले होते. तेव्हा राजमाता जिजाबाई गरोदर असल्याने त्यांना घोड्यावर बसून पुणे कडे प्रवास करणे शक्य नव्हते. म्हणून शहाजीराजे यांनी जिजाऊ माता यांना विश्वासराव आणि वैद्यराज निरगुडकर (एक डॉक्टर) यांच्या देख रेखी खाली शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. या दरम्यान, लखोजी राजे जाधव जुन्नर ला पोहोचले आणि अनेक वर्षांनी त्यांची अनियोजित आपल्या मुली सोबत शिवनेरी किल्ल्या वर भेट झाली. 

तेव्हा जिजाबाई वडिलांना म्हणाल्या, ‘मराठे केवळ अहंकार आणि लोभासाठी एकमेकांशी भांडत आहेत. जर त्यांच्या शूर तलवारी एक झाल्या तर परकीय आक्रमकांचा काही क्षणातच पराभव होईल. आपल्या उदरनिर्वाहा साठी आक्रमकांच्या हाता खाली काम करणे हे मराठ्यान साठी अपमानास्पद आहे, आपण ते सोडले पाहिजे '. 

राजमाता जिजाबाईंची प्रखर देश भक्ती आणि धर्म प्रेम त्यांच्या वडिलांना स्पर्शून गेले. जिजाऊंच्या मनस्वी विचाराने लखोजीराजे यांना आत्म परीक्षण करण्यास भाग पाडले. या मुळे जाधव आणि भोसले यांच्यातील वैर कायमचे संपुष्टात आले.

या एका घटनेने राजमाता जिजाऊ यांच्या मधील ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा भरून देण्याचे काम केले. आणि या एका घटने मुळे राजमाता जिजाऊ यांना कळून चुकले होते कि, स्वराज्य निर्मिती होणे हि संकल्पना अशक्य नाही. परिणामी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बाल वया पासूनच स्वराज्य निर्मितीचे बाल कढू देण्यास सुरुवात केली. 

जिजाऊ मातेने, शिवाजी राजे यांना उत्तम नैतिकते चे, शास्त्र आणि शस्र यांची शिकवण दिली. त्यांना बुद्धी ने चतुर आणि शस्रात विपुल बनवले आणि लहान पणा पासूनच त्यांच्या मध्ये स्वतंत्र स्वराज्य निर्मिती ची इच्छा जागृत केली. 

राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणे ने शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापने ची शपथ घेतली आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी एका छोट्या सैन्याचा ते नेता बनले. आणि पुढे कश्या प्रकारे शिवाजी राजे भोसले यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती ची संकल्पना ते सिद्धी गाठली,  हे आपणा सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. 

स्वराज्य निर्मिती साठी राजमाता यांनी फक्त शिवाजी राजे भोसले यांनाच प्रेरित नवते केले तर या सोबत 

त्यांनी आपले वडील लखोजी राजे जाधव आणि त्यांचे पती शहाजी राजे भोसले यांना मुघलांची सेवा सोडून स्वतंत्र "स्वराज्य" राज्य स्थापन करण्यास प्रेरित केले. कारण राजमाता जिजाऊ यांचे ध्येय फक्त महाराष्ट्रा तून परकीय आक्रमकांना पळवून लावने नव्हते तर, सर्व मराठी सरदारांना संगठीत करून मराठा साम्राज्य उभे करायचे हे हि होते. 

जिजामाता जिजाऊ यांना आपल्या अधिकार क्षेत्रातील प्रांताला कल्याणकारी राज्य बनवण्याची खूप इच्छा होती. म्हणून राजमाता जिजाऊ या, आपल्या हद्दीतील प्रांतात घडणाऱ्या प्रत्येक आर्थिक- सामाजिक- राजकीय- न्यायिक घडामोडीं मध्ये स्वतः हून सक्रिय रस घेत असे आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यां वर आपले मत मांडत असे. 

आणि ते म्हणतात ना, 

"मंजिल सिर्फ उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, 

सिर्फ पंख होणे से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है !"


असाच हौसला (आशा) हा राजमाता जिजाऊ यांच्या अंगी होता. म्हणूनच त्यांच्या स्वतंत्र "स्वराज्य " राज्या ची महत्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केली. आणि राजमाता जिजाऊ यांच्या अधिपत्या खाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक छोटे - मोठे किल्ले जिंकून "मराठा साम्राज्य " याची स्थापना केली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊन अवघ्या 12 दिवसांनी राजमाता जिजाबाई यांनी 1674 च्या रोजी अखेरचा श्वास घेतला. 

राजमाता जिजाबाईंच्या रूपाने 'आदर्श महिला कशी असावी ?' याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे. 

राजमाता जिजाऊ मधील तीव्र तळमळ, श्रद्धा, दृढ निश्चय, संयम, धर्मा प्रती आदराची भावना, नि: स्वार्थी पणा, चाणाक्ष बुद्धी, योद्धा वृत्ती, व्यापक विचार सरणी, निर्भयता, नेतृत्व, धैर्य, युद्ध नीती, चातुर्य, त्याग करण्याची वृत्ती तसेच, इच्छा शक्ती असे बहुआयामी गुण होते. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती (Rajmata Jijau Jayanti) निमित्त समाजातील सर्व महिला मध्ये या क्षमता विकसित व्हाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आपण सर्वांनी शांत चित्त पणे बसून माझे भाषणातील विचार ऐकले म्हणून मी आपल्या सर्वांचा/ ची ऋणी आहे. एवढे बोलुनी मी आपल्या सर्वांची रजा घेते.

जय जिजाऊ, जय शिवराय. 

भारत माता कि जय . 


 राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन व कविता थोडक्यात माहिती वाचली आहे त्याचा उपयोग करून आपण छान असा निबंध भाषण व सूत्रसंचालन करू शकता. तुम्हां सर्वांना राजमाता जिजाऊ याच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.माहिती आवडल्यास नक्की कळवा.

FAQ


Q. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला राजमाता ? 

ANS. जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला

Q. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ?

ANS. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला

Q. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते ?

ANS. राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरिजाबाई  होते

Q. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

ANS. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते


✡️ हे पण वाचा >

🆕 सावित्रीबाई फुले निबंध व शुभेच्छा

🆕 सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त निबंध भाषण व शुभेच्छा

🆕 लाला लजपतराय निबंध व भाषण

🆕 मकर संक्रांती निबंध मराठी

🆕 स्वामी विवेकानंद जयंती निमित्त निबंध व भाषण

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण व निबंध शुभेच्छा

🆕 नवीन वर्षाच्या शुभेच्छा व इतिहास
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad